Kiran Pawaskar : खोटे गुन्हे दाखल करणे ही तर ठाकरेंची परंपराच..!

Kiran Pawaskar : खोटे गुन्हे दाखल करणे ही तर ठाकरेंची परंपराच..!

| Updated on: Sep 11, 2022 | 8:45 PM

दंगली घडवायच्या असतील तर आधी आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या हातामध्ये दगड देऊन त्यांना रस्त्यावर उतरवा असा सल्लाच पावसकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. गोरगरिबांच्या लेकरांवर गुन्हे दाखल होऊ द्यायचे आणि आपला स्वार्थ साधायचा हीच त्यांची परंपरा असल्याचा घणाघात पावसकर यांनी केला आहे.

मुंबई :  (MVA) महाविकास आघाडी सरकारच्या काळात यांनी कंगना रनौत, राणा दाम्पत्य आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हीच परंपरा (Uddhav Thackeray) ठाकरे परिवाराची राहिलेली आहे. आतापर्यंत शिवसैनिकांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन डाव साधला आहे. त्यामुळे येथून पुढे दंगली घडवायच्या असतील तर आधी (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांच्या हातामध्ये दगड देऊन त्यांना रस्त्यावर उतरवा असा सल्लाच पावसकर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे. गोरगरिबांच्या लेकरांवर गुन्हे दाखल होऊ द्यायचे आणि आपला स्वार्थ साधायचा हीच त्यांची परंपरा असल्याचा घणाघात पावसकर यांनी केला आहे. तुमचे होते राजकारण पण यामध्ये गोरगरीब घरातील शिवसैनिक अडकतो. गेल्या सतरा वर्षापासून मी याचीच शिक्षा भोगत असल्याचेही पावसकर म्हणाले आहेत.

Published on: Sep 11, 2022 08:45 PM