Nanded Monkey | धुडगूस घालणाऱ्या वानराला अखेर पकडले , दोन महिन्यांपासून देत होते त्रास

Nanded Monkey | धुडगूस घालणाऱ्या वानराला अखेर पकडले , दोन महिन्यांपासून देत होते त्रास

| Updated on: Sep 09, 2022 | 3:10 PM

Nanded Monkey | नांदेड जिल्ह्यातील धुडगूस घालणाऱ्या वानराला वनविभागाने अखेर पकडले.

Nanded Monkey | गेल्या दोन महिन्यांपासून नागरिकांना, लहान मुलांना त्रास देणाऱ्या आणि दहशत माजवणाऱ्या वानराला वनविभागाने पकडले. या माकडाने (Monkey)दोन महिन्यांपासून उच्छाद मांडला होता. नांदगाव आणि परिसरात वानराच्या टोळीने हैदोस घातला होता. त्यामुळे नागरिकांचे जगणे मुश्कील झाले होते. या वानरामुळे नांदगाववासीय धास्तावले होते. हे माकडं केव्हाही कोणावर धाऊन जात होते. या माकडाने गावातील 6 जणांना चावा घेतला होता. त्यांच्यावर उपचार झाले. परंतु, माकडापासून सूटका करण्यासाठी नागरिकांनी वनविभागाकडे मागणी केली होती. वानराला पकडण्यासाठी वनविभागाने ट्रॅप लावला होता. अखेर माकडला पकडण्यात (Caught) वनविभागाला मोठे यश आले. माकडाला पकडल्यामुळे नागरिकांनी सूटकेचा निश्वास सोडला. पण दोन महिन्यांपासून नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगावे लागले. आता वानराला पकडल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे.

 

Published on: Sep 09, 2022 03:10 PM