पॅनकार्डला ओळखपत्र म्हणून मान्यता; मोदी सरकारची मोठी घोषणा
पॅनकार्डला आता ओळखपत्र म्हणून मान्यता मिळणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. पाहा आणखी कोणत्या बाबींचा या अर्थसंकल्पात समावेश आहे...
पॅनकार्डला आता ओळखपत्र म्हणून मान्यता मिळणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केली आहे. येत्या वर्षासाठीचं देशाचं बजेट सादर केलं जात आहे. यावेळी बोलताना निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केलीय. तसंच गोरगरिबांना मोफत रेशन देणार असल्याचीही घोषणा केली आहे. पुढील 1 वर्षासाठी मोफत अन्नधान्य योजना आखली जाणार आहे. त्यासाठी 2 लाख कोटींचं बजेट असेल. तसंच रेल्वेसाठी 2.40 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
Published on: Feb 01, 2023 12:11 PM
Latest Videos