लातूरच्या वाढवणामध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग, 6 एकरवरील ऊस जळून खाक
लातूर (Latur) जिल्ह्यातल्या वाढवणा इथं शॉर्टसर्किटमुळे आग (Fire) लागल्याने सहा एकरावरील ऊस (sugarcane) जळाला आहे.
लातूर (Latur) जिल्ह्यातल्या वाढवणा इथं शॉर्टसर्किटमुळे आग (Fire) लागल्याने सहा एकरावरील ऊस (sugarcane) जळाला आहे , हळद-वाढवणा येथील शेतकरी नारायण चव्हाण यांच्या शेतातील विद्युत खांबावर शॉर्ट-सर्किट झाल्याने उडालेल्या ठिणग्यांनी ऊस पेटला आणि बघता बघता ही आग सहा एकरावर पसरली . आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले मात्र तोपर्यंत आग पसरली होती . या आगीत कसलीही जीवित हानी झालेली नाही . जळालेला ऊस कारखान्याने घ्यावा आणि शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे .
Published on: Feb 08, 2022 11:36 AM
Latest Videos