उस्मानाबादमध्ये सरपंचांवर गोळीबार; घटनेने खळबळ

उस्मानाबादमध्ये सरपंचांवर गोळीबार; घटनेने खळबळ

| Updated on: Jun 18, 2022 | 9:29 AM

वाशीच्या फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. या घटनेतून बिक्कड हे थोडक्यात वाचले आहेत. त्यांच्या वाहनावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या.

उस्मानाबादमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. वाशीच्या  फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. अज्ञात व्यक्तीकडून बिक्कड यांच्या वाहनावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. या जीवघेण्या हल्ल्यातून बिक्कड थोडक्यात बचावले आहेत. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र हा हल्ला का करण्यात आला हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.