Shinde Group Candidate List : शिंदे गट शिवसेनेच्या पहिल्या यादीत 45 जणांपैकी ‘या’ 6 उमेदवारांना पहिल्यांदा संधी
भाजपने गेल्या रविवारी तब्बल ९९ उमेदवारांची यादी जाहीर केल्याचे पाहायला मिळाले होते. भाजपच्या पहिल्या यादीतील उमेदवारांची घोषणा होताच एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी आपल्या उमेदवारांची यादी कधी जाहीर करणार? याकडे लक्ष लागलेलं असताना अखेर शिंदेंच्या शिवसेनेची यादी जाहीर झाली
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून काल उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत 45 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहे. शिंदे गट शिवसेनेच्या पहिल्या यादीत 6 नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये सहा नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. चोपडा येथून चंद्रकांत बळवंत सोनवणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एरंडोलमधून चिमणराव पाटील यांचा मुलगा अमोल चिमणराव पाटील, पैठणमधून संदीपान भुमरे यांचे पुत्र विलास भुमरे, राजापूर मतदारसंघातून मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांना शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दिवंगत आमदार अनिल बाबर यांचे पुत्र सुहास बाबर यांना खानापूर मतदारसंघातून तिकीट, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र अभिजित अडसूळ यांनाही संधी देण्यात आली आहे. जोगेश्वरी (पूर्व) मतदारसंघातून खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना तिकीट देण्यात आलं आहे.