भाजप नेत्याचा मोठा गौप्यस्फोट, चर्चेत काय काय घडलं ? फडणवीसांनी काय तंबी दिली ?
कसबा पोटनिवडणुकीत साधारण ४० ते ४५ टक्के मतदान होईल. आमचे नगरसेवक आणि स्टार प्रचारक पाहता ही निवडणूक भाजप उमेदवार २८ ते २५ हजार मतांनी निवडून येईल,
पुणे : कसबा पोटनिवडणुकीमध्ये भाजप विरोधात तीन पक्ष आहेत. त्यांची आघाडी असल्यामुळे या निवडणुकीत विजयी होण्यासाठी काय करायचे याचे मार्गदर्शन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले, अशी माहिती पुणे भाजप शहर नेते संजय काकडे यांनी दिली. कसबा पोटनिवडणुकीत साधारण ४० ते ४५ टक्के मतदान होईल. आमचे नगरसेवक आणि स्टार प्रचारक पाहता ही निवडणूक भाजप उमेदवार २८ ते २५ हजार मतांनी निवडून येईल, असा दावाही त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या नियोजनाबाबत मिटिंग घेतली. आगामी अनेक निवडणूक होणार आहेत त्यामुळे कुठल्याही प्रकारची रिस्क नको. महाराष्ट्रातील सगळ्याच नेत्यांनी निवडणूक होईपर्यत आपली कामे बाजूला ठेवा. २६ तारखेपर्यंत ज्यांना जबाबदारी दिली आहे त्या नेत्यांनी कुठेही जायचे नाही अशी तंबी दिल्याचे काकडे यांनी सांगितले.
Latest Videos