पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी पाडली भिंत, युवासेनेने दिला 'हा' इशारा

पंतप्रधान मोदी यांच्या सभेसाठी पाडली भिंत, युवासेनेने दिला ‘हा’ इशारा

| Updated on: Jan 22, 2023 | 3:17 PM

चार दिवस उलटूनही ही भिंत पूर्ववत करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( NARENDRA MODI ) यांच्या मुंबई येथील बीकेसी ( BKC ) मैदानात झालेल्या सभेदरम्यान मुंबई विद्यापीठाच्या मागील भिंत पार्किंगसाठी तोडण्यात आली आहे. भिंत त्वरित बांधून द्या नाही तर युवासेना स्वखर्चाने ही भिंत बांधून देईल असा इशारा ठाकरे गटाच्या युवासेनेने दिला आहे.

ठाकरे गटाच्या युवासेनेचे अधिसभा सदस्यांनी यासंदर्भात प्रभारी कुलगुरूंना पत्र दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगसाठी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पस येथील महिला वसतीगृहा जवळील भिंत पाडण्यात आली. या सभेला चार दिवस उलटूनही ही भिंत पूर्ववत करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे याकडे या पत्रातून लक्ष वेधण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने ही भिंत बांधून द्यावी अन्यथा आम्ही ही भिंत बांधू असा इशाराही युवासेनेने दिला आहे.

Published on: Jan 22, 2023 03:17 PM