४६ वर्षानंतर पहिल्यांदाच असं काय झालं ज्याणे विठ्ठल मंदिरात होतेय मोठी गर्दी!

४६ वर्षानंतर पहिल्यांदाच असं काय झालं ज्याणे विठ्ठल मंदिरात होतेय मोठी गर्दी!

| Updated on: Jul 12, 2023 | 8:13 AM

१९७३ मध्ये जलाशयामुळे गाव विस्थापित झाले आणि हे मंदिर पाण्याखाली गेलं. त्यानंतर शासनाने 'सिमेंट काँक्रीट'मध्ये विठ्ठलाचे नवे मंदिर बांधून दिले. परंतु, ते पाडून कोट्यवधी रूपये खर्च करून ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जुन्या मंदिराची प्रतिकृती असणारे भव्य मंदिर पुर्नवसित गावात बांधले आहे.

बेळगाव : हिडकल जलाशयाचे १९७७ मध्ये काम पूर्ण झाले. बुडीत क्षेत्रातील विस्थापित २४ खेड्यांपैकी हुन्नूर ग्रामस्थांचे विठ्ठल हे ग्रामदैवत आहे. ३० बाय ३० आकाराचे हे मंदिर काळ्या पाषाणात स्थानिक कारागीरांनी चुनखडीत बांधले आहे. मंदिराचे खांब, चौकटी, खिडक्या, छत, तसेच सुमारे ४० फूट उंचीचे शिखरही दगडी आहे. १९७३ मध्ये जलाशयामुळे गाव विस्थापित झाले आणि हे मंदिर पाण्याखाली गेलं. त्यानंतर शासनाने ‘सिमेंट काँक्रीट’मध्ये विठ्ठलाचे नवे मंदिर बांधून दिले. परंतु, ते पाडून कोट्यवधी रूपये खर्च करून ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून जुन्या मंदिराची प्रतिकृती असणारे भव्य मंदिर पुर्नवसित गावात बांधले आहे. मात्र आता गावकऱ्यांसह परिसरातील विठ्ठल भक्तांना पुन्हा एकदा या विठ्ठल मंदिर पहायला मिळत आहे. हिडकल जलाशयाच्या पाण्याखाली गेलेले हुन्नुरचे हेमांडपंथी श्री विठ्ठल मंदिर व गाभाऱ्यातील मातीची मूर्तीचे तब्बल ४६ वर्षानंतर दर्शन लोकांना घेता येत आहे. आजही मंदिर व गाभाऱ्यातील मातीची मूर्ती ही सुस्थितीत आहे. मान्सूनचा पाऊस लांबल्यामुळे ५१ टीएमसी क्षमतेच्या जलाशयातील पाण्याने यावर्षी तळ गाठल्याने तब्बल चार दशकानंतर पहिल्यांदाच हे मंदिर पूर्णत: पाण्याबाहेर आले आहे. त्यामुळे बेळगांव जिल्ह्यासह सीमाभागातील भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत आहे. विशेष बाब म्हणजे हे विठ्ठल मंदिर असले तरी याठिकाणी विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती नाही. वर्षानुवर्षाच्या ‘चंद्र’लेपणामुळे वारूळावर शेंदूरसदृश्य थर तयार झाला आहे. ४६ वर्षे पाण्यात राहूनही हे वारूळ विरघळलेले नाही, त्यावरील घोंगड्याची घडीही मोडलेली नाही.

Published on: Jul 12, 2023 08:13 AM