2024 मध्ये भाजपची एकहाती सत्ता

2024 मध्ये भाजपची एकहाती सत्ता

| Updated on: Jun 11, 2022 | 9:03 PM

देवेंद्र फडणवीस यांनी अंतर्गत राजकारणालाही हात घालत सरकारमधीलच काही मंत्री आम्हाला भेटल्याचे सांगत त्यांनी उमेदवार मागे घेऊ नका असा सल्लाही त्यांनी दिला असे सांगितले.

राज्यसभेच्या निवडणुकीत गेमचेंजर म्हणून पुढे आलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. त्यांनी म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांना जाहीररित्या सांगितले आहे की, येत्या 2024 मध्ये राज्यात भाजपचे सरकार येणार आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना भाजपचे यश बघून महाविकास आघाडीचे तोंडचे पाणी पळाले आहे असा टोलाही त्यांनी लगावला आहे.भविष्यात येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्येसुद्धा भाजपचेच उमेदवार निवडून येतील असा विश्वासही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी अंतर्गत राजकारणालाही हात घालत सरकारमधीलच काही  मंत्री आम्हाला भेटल्याचे सांगत त्यांनी उमेदवार मागे घेऊ नका असा सल्लाही त्यांनी दिला असे सांगितले.

Published on: Jun 11, 2022 08:55 PM