माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात दाखल; उद्धव ठाकरे यांनी केली तब्येतीची विचारपूस

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी रुग्णालयात दाखल; उद्धव ठाकरे यांनी केली तब्येतीची विचारपूस

| Updated on: May 23, 2023 | 5:58 PM

मनोहर जोशी यांना मेंदूशी संबंधित व्याधी असून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह हिंदूजा रुग्णालयात दाखल झालेत.

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांची प्रकृती खालावली असून त्यांच्यावर हिंदूजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार केले जात आहेत. मनोहर जोशी यांना मेंदूशी संबंधित व्याधी असून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यादरम्यान उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह हिंदूजा रुग्णालयात दाखल झालेत. त्यांनी मनोहर जोशी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. शिवसेना भाजप युतीच्या सरकारमध्ये ते मुख्यमंत्री बनले होते. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मनोहर जोशी यांच्या दादर परिसरातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यावेळी मनोहर जोशी हे शिवसेनेत बिलकूल सक्रिय नव्हते. त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्या गटात जातील अशी चर्चा सुरू होती. मात्र आपण पहिल्यापासून शिवसेनेतच आहोत, त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यासोबत सातत्याने उभा राहू अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

Published on: May 23, 2023 02:10 PM