शिवसेनेचे चिन्हं, नाव गोठवून हिंदुत्ववादी मतं एका पेटीत आणण्याचा भाजपाचा डाव
बंडखोरी नाट्य घडत असतानाच पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधत त्यांनी म्हटले की, शिवसेनेचे चिन्ह, नाव गोठवून हिंदुत्ववादी मतं एका पेटीत आणण्याचा डाव भाजपचा सुरू आहे असा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला.
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची, हिंदुत्वाची शिवसेना असल्याचे सांगत शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह आपलेच आहे आणि त्यासाठी त्यांनी कायदेशीर लढाई लढण्याचेही धाडस दाखवले. शिवसेनेचे चिन्ह असलेले धनुष्यबाण हे उद्धव ठाकरे यांच्या गटाचे की बंडखोर शिंदे गटाचे आहे याबाबत कायदेतज्ज्ञांसह आता राजकीय नेत्यांकडूनही त्याबद्दल चर्चा केली जात आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शिवसेनेच्या धनुष्यबाणाबाबत बोलताना सांगितले की, शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गोठवून हिंदुत्ववादी मतं एकाच पेटीत आणण्याचा डाव असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली आहे. बंडखोरी नाट्य घडत असतानाच पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधत त्यांनी म्हटले की, शिवसेनेचे चिन्ह, नाव गोठवून हिंदुत्ववादी मतं एका पेटीत आणण्याचा डाव भाजपचा सुरू आहे असा आरोपही त्यांच्याकडून करण्यात आला. त्यामुळे सगळ्याच पक्षांनी सावध राहणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.