संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे अधिवेशनात पडसाद; ‘भिडे बोगस, त्यांची डिग्री काय?’ : पृथ्वीराज चव्हाण
यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यावरून आज लक्ष वेधीत मांडताना, मला धमकीचे फोन आणि ई-मेलही आले. तसे यशोमती ठाकूर आणि इतर नेत्यांना आले आहेत.
मुंबई, 2 ऑगस्ट 2023 | संभाजी भिडे यांनी अमरावतीमध्ये राष्ट्रपती महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद आता राज्यभर उमटत आहेत. तर भिडे यांच्या त्या वक्तव्याचा निषेध करत काँग्रेसने आंदोलन छेडलं आहे. तर त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. यावरून आज लक्ष वेधीत मांडताना, मला धमकीचे फोन आणि ई-मेलही आले. तसे यशोमती ठाकूर आणि इतर नेत्यांना आले आहेत. यानंतर केलेल्या तक्रावरून त्या व्यक्तिला अटक झाली आहे. तर जामिनावर सुटका देखील झाली आहे. मात्र या युवकाला धमकी देण्यासाठी प्रवृत्त कोणी केलं असा सवाल केला आहे. तर भिडे हा एक बोगस माणूस आहे. त्यांची डिग्री काय आहे? त्यांनी कुठे शिक्षण घेतलंय? हे कुठे प्राध्यापक होते? सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा माणूस सोनं गोळा करतोय. कायद्याप्रमाणे कुठल्याही संस्थेला वर्गीणी जमा करायची असेल तर त्याला जिल्हाधिकाऱ्यांकडे संस्था रजिस्टर करावी लागते. त्याचा हिशोब द्यावा लागतो. हा माणूस कितीतरी टनानं सोनं गोळा करणारा आहे. 1 ग्रॅम सोनं प्रत्येकाकडून घेतोय. लोकांची दिशाभूल करतोय अशी घणाघाती टीका केली आहे.