‘चंद्रयान-3 मोहिमेच्या यशाने भारताचा जगभरात दबदबा वाढला’; पृथ्वीराज चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया
अंतरिक्ष आयोगाचे सदस्य राहिलेले व इस्रोचे काम जवळून पाहिलेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चांद्रयान-3 यशस्वी मोहिमेनंतर शास्त्रज्ञांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
नागपूर : 24 ऑगस्ट 2023 | भारताचं मिशन मून अखेर यशस्वी झालं आहे. चांद्रयान -3 चे विक्रम हा लँडर देखील चंद्राच्या सुरक्षितरीत्या पृष्टभागावर उतरला आहे. तर त्याने चोर पोफो पाठवत आपला संदेश देखील पाठवला. तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा जगातील एकमेव देश ठरला असून भारताने इतिहास घडवला आहे. त्यावरून काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चांद्रयान-3 यशस्वी मोहिमेनंतर शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे. चव्हाण हे अंतरिक्ष आयोगाचे सदस्य राहिलेले असून त्यांनी इस्त्रोचे काम जवळून पाहिलेले आहे. यावेळी चव्हाण यांनी, ही भारताची खूप मोठी उपलब्धता असून या चंद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर भारताचा जगभरामध्ये नक्कीच दबदबा वाढला आहे. तसेच या चंद्रयान मोहीम यशस्वी झाल्याने भारताला याचा अप्रत्यक्ष फायदा देखील मोठ्या प्रमाणात होईल. देशातील वातावरण पॉझिटिव्ह करण्यासाठी देखील या मोहिमेचा फायदा होणार असल्याचं सांगितलं.