संभाजी भिडे वादग्रस्त वक्तव्य प्रकरण चिघळलं; चव्हाण यांचा थेट सवाल? ‘हा माणूस भाजपनं पेरला आहे का?’
भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनात देखील उमटले होते. त्यावेळी संभाजी भिडे प्रकरणावरून सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी देखील झाल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई, 3 ऑगस्ट 2023 | गेल्या काही दिवसापासून राज्यात संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून वाद सुरू आहे. भिडे यांनी महात्मा गांधी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद पावसाळी अधिवेशनात देखील उमटले होते. त्यावेळी संभाजी भिडे प्रकरणावरून सभागृहात सत्ताधारी-विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी देखील झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सभागृहात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात गुरूजी शब्दावरून चांगलीच जुंपली होती. त्यानंतर आता चव्हाण यांनी भाजपवर टीकास्त्र सोडताना काही सवाल केले आहेत. तर भिडे यांच्यावर देखील टीका केली आहे. यावेळी हा गंभीर विषय असून आरएसएसच्या काही संघटना आहेत. त्यात काही छुप्या आहेत. त्यांना ते गुप्तपणे काम करायला सांगतात. त्यापैकीच संभाजी भिडे यांची संघटना आहे का? भिडे हा धार्मिक आणि जातीय तेड निर्माण करतो. तर विदर्भात त्याला काम करण्यास आरएसएसने सांगितलं आहे का? कारण तेथे भाजपची स्थिती बिकट आहे. त्यामुळे भिडे हा भाजपणे पेरलेला माणूस आहे का अशी शंका येत असल्याचेही चव्हाण म्हणालेत. Maharashtra Politics