मणिपूर महिलांची विवस्त्र धिंड; काँग्रेस आक्रमक; काँग्रेस नेत्याकडून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकास्त्र
तेथे महिलांची नग्न धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार आता उघड झाला आहे. ज्यानंतर आता समाज माध्यमांवर टीकेची झोड उडलेली आहे. तर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली आहे.
मुंबई, 22 जुलै 2023 | मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. तेथील हिंसाचार अजूनही शांत झालेला नाही. तर त्यानंतर तेथे महिलांची नग्न धिंड काढल्याचा धक्कादायक प्रकार आता उघड झाला आहे. ज्यानंतर आता समाज माध्यमांवर टीकेची झोड उडलेली आहे. तर मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली आहे. याचमुद्द्यावरून विरोधकांसह काँग्रेसदेखील आक्रमक झाली आहे. यावेळी काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे. यावेळी चव्हाण यांनी, पंतप्रधान मोदी यांच्या २०१७ मधील ट्विटची आठवण करून देताना, २०१७ ला मणिपूरला काँग्रेसचे सरकार असतना, ज्या सरकारला राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखता येत नाही तर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. त्यामुळे आता पंतप्रधान मोदी यांना विचारायचं आहे की २०१७ आणि २०१४ चेच विचार आताही आपले आहेत का? तर त्वरित तेथील सरकार बरखास्त करा अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. तर सातत्याने केंद्राकडून असं दुर्लक्ष केलं जात असून जनता या सगळ्यांना उत्तर देईल असेही ते म्हणाले.