माझा बाप चोरला? माझा बाप चोरला? माहीत आहे तर तक्रार द्या, ठाकरेंवर कोणी केली जहरी टीका?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेत्याने उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. तसेच ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे जादू नाही. ही जहरी टीका पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी केली आहे
जळगाव : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उद्धव ठाकरेंची जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे विराट सभा होणार आहे. तसेच, दिवंगत माजी आमदार आर. ओ पाटील यांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेत्याने उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका केली आहे. तसेच ठाकरे यांच्यात बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे जादू नाही. ही जहरी टीका पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका करताना “माझ्यावर संस्कार असल्याने उद्धव ठाकरेंचं स्वागत करत असल्याचे म्हटलं आहे. त्याचबरोबर ठाकरेंच्यात एवढी जादू असती, तर दीडशे पैकी ५६ जागा आल्या नसत्या. जर त्यांच्या सभेमुळेच सर्वजण आमदार झाले असते, तर उद्धव ठाकरेंनी २८८ मतदारसंघात सभा घेतल्या असत्या. तर त्यांच्या त्याच त्याच भाषणाला जनता कंटाळली आहे. तर माझा बाप चोरला? माझा बाप चोरला? असं लहान मुलासारखं ठाकरे बोलतात असा घणाघात केला आहे. जर तुम्हाला कोणी बाप चोरला हे माहित आहे तर मग द्याना पोलिसांत तक्रार असा टोला लगावला आहे.