ज्या पक्षाचे सरकार त्या पक्षाचा राष्ट्रपती

ज्या पक्षाचे सरकार त्या पक्षाचा राष्ट्रपती

| Updated on: Jul 18, 2022 | 7:38 PM

केंद्रातील सरकारवर बहुंताशी अवलंबून असते मात्र आता निवडणुकीचे कल काय आहेत त्यावर आता राष्ट्रपती कोण हे ठरेल असंही त्यांनी सांगितले.

सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत कोणत्या ना कोणत्या निवडणुकींची चर्चा आहे. त्यातच आता राष्ट्रपती पदाची निवडणूक होत आहे. त्याबाबत माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, केंद्रात ज्यांची सत्ता असते त्यांचाच राष्ट्रपती असतो मात्र यावेळी परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आता केंद्रात असणाऱ्या सरकारचा राष्ट्रपती असेल का याविषयी कोणीहा सांगू शकत नाही. कारण राजकीय परिस्थिती प्रचंड बदलली असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे मी सध्या वेट अँड वॉच अशा भूमिकेत असल्याचेही सुशीलकुमार शिंदे यांनी सांगितले. केंद्रातील सरकारवर बहुंताशी अवलंबून असते मात्र आता निवडणुकीचे कल काय आहेत त्यावर आता राष्ट्रपती कोण हे ठरेल असंही त्यांनी सांगितले.

Published on: Jul 18, 2022 07:38 PM