कोकणातच प्रदूषणकारी प्रकल्प का? याची उत्तर द्यावीत; शिवसेना नेत्याचा घणाघात

कोकणातच प्रदूषणकारी प्रकल्प का? याची उत्तर द्यावीत; शिवसेना नेत्याचा घणाघात

| Updated on: May 06, 2023 | 10:18 AM

त्यामुळे ते फक्त पत्रकार परिषद घेतील. त्याचबरोबर ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे का विरोध करत आहेत हे जाणून घेतील अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी दिली

राजापूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारसू येथील ग्रामस्थांना भेटण्यासाठी जात आहेत. मात्र कायदा सुव्यवस्थेच्या कारणास्तव त्यांना बारसू येथे सभेची परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे ते फक्त पत्रकार परिषद घेतील. त्याचबरोबर ग्रामस्थांचं काय म्हणणं आहे का विरोध करत आहेत हे जाणून घेतील अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी दिली. यावेळी त्यांनी समर्थन करण्यासाठी मोर्चा काढणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. राऊत यांनी, राणे हे सत्तेत आहेत. त्यांचा पक्ष सत्तेत आहे. मन त्यांना ठाकरे विरोधात असे मोर्चे का काढावे लागत आहेत. रिफायनरीच्या समर्थनात भाजपला आंदोलन करायची गरज काय भासली? नारायण राणे यांना आंदोलन करायची गरज का भासली? असा सवाल केला आहे. तर ज्यांचा विरोध आहे त्या ग्रामस्थांच्या घरापर्यंत शासनाने जाऊ नये? त्यांच्या हृदयापर्यंत का पोहोचू नये याचं आधी उत्तर द्यावं राणे यांनी द्यावं असा घणाघात राऊत यांनी केला आहे.

Published on: May 06, 2023 10:18 AM