Vinayak Raut | रिफायनरीला विरोध करणारे शिवसेनेचे MLA Rajan Salavi दलाल नाही – tv9
सरकारच्या विरोधात लढत आहेत त्या आमदारांच्या बरोबर संवाद साधनं त्यांच्या काही अडचणी समजून घेण्याचे काम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार असल्याचे शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं आहे.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सर्वच लोकप्रतिनिधींची एक संयुक्त बैठक घेण्याचे ठरवले आहे. यात महाविकास आघाडीचे जे आमदार सरकारच्या विरोधात लढत आहेत त्या आमदारांच्या बरोबर संवाद साधनं त्यांच्या काही अडचणी समजून घेण्याचे काम माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार असल्याचे शिवसेना नेते आणि खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं आहे. त्याच बरोबर त्यांनी महाविकास आघाडी आजही किती भक्कम असल्याचेही सांगितलं आहे. तसेच ज्यांनी शिवसेनेशी बेईमानी केली गद्दारी केली त्यांनी आधीत आणि स्वत: हून राजीनामा देणे गरजेचे होते. मात्र त्यांनी तसे केले नसल्यानेच त्यांची हाकालपट्टी केल्याचेही विनायक राऊत यांनी सांगितले. तर मनसे आणि शिवसेनेच्या संदर्भात जो काही निर्णय घायचा तो उद्धव ठाकरेच घेतील असेही त्यांनी सांगितलं. तर शिंदे गटाचं विसर्जन करण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करणार असेही राऊत यांनी सांगितलं आहे.