ठाकरेंच्या स्वागतासाठी नाही तर किमान..; राणेंच्या 'त्या' आव्हानाची हवाच राऊतांनी काढली

ठाकरेंच्या स्वागतासाठी नाही तर किमान..; राणेंच्या ‘त्या’ आव्हानाची हवाच राऊतांनी काढली

| Updated on: May 06, 2023 | 12:37 PM

बारसूत ठाकरे यांना येऊ देणार नाही, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला होता. नारायण राणे यांनी दिलेल्या इशाऱ्याची ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. त्यांनी त्यांच्या या आव्हानाची पार हवाच काढली.

मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज रत्नागिरीतील बारसूच्या दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यापूर्वीच विरोधकांची टीका ठाकरे यांच्यावर होताना दिसतेय. बारसूत ठाकरे यांना येऊ देणार नाही, असा इशारा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिला होता. नारायण राणे यांनी दिलेल्या इशाऱ्याची ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी खिल्ली उडवली आहे. त्यांनी त्यांच्या या आव्हानाची पार हवाच काढली. तसेच त्यांच्यावर टीका करताना, किमान आव्हान करताय तर राणे पिता-पुत्रांनी ठाकरेंच्या स्वागतासाठी यायला हवं होतं. पण ते आले नाहीत. ते म्हणाले होते, पाय ठेवू देणार नाही. पण असो, त्यांनी उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी नाही तर किमान त्यांचा आणि लोकांचा होणार संवाद तरी पाहण्यासाठी ते हजर असते तर बरं झालं असतं. यादरम्यान राऊत यांनी राणे यांच्याव आव्हानावर बोलताना, येऊ देणार नाही म्हणजे काय? तुमच्या या पोकळ धमक्या बंद करा, असा थेट इशारा दिला होता. तर उद्धव ठाकरे यांना रोखून तर दाखवाच, असं आव्हानही संजय राऊत यांनी दिलं.

Published on: May 06, 2023 12:37 PM