ठाकरे यांचा दे धक्का! उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा ‘हा’ माजी खासदार शिवसेनेत प्रवेश करणार
लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे गटाला सुगीचे दिवस येत असल्याचे दिसत आहे. गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेशी फारकत घेतलेले नेते हे ठाकरे गटात परतत आहेत. शिर्डीचे माजी खासदार हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.
मुंबई : 23 ऑगस्ट 2023 | आगामी लोकसभा निवडणूकांवरून उद्धव ठाकरे तयारीला आणि मोर्चे बांधणीला लागले आहेत. गेल्या वर्षी शिवसेनेत बंडाळी झाली आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तब्बल १३ खासदार गेले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची केंद्रातील पकड कमी झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंनी खासदारकीला महत्त्व देत कार्यक्रम आखला आहे. तर त्यांच्याकडून आढावा बैठकांना जोर आला आहे. याचदरम्यान शिवसेनेचे जुने नेते आणि काँग्रेसचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या मार्गावर आहेत. ते उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे अहमदनगर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढण्यास मदत मिळणार आहे. तर काँग्रेस, भाजप असा प्रवास करत वाकचौरे हे आज घरवापसी करत शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप

कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य

सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत

'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
