‘शिंदे गटातील एकसुद्धा आमदार अपात्र होणार नाही’; काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

‘शिंदे गटातील एकसुद्धा आमदार अपात्र होणार नाही’; काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य

| Updated on: Aug 14, 2023 | 3:03 PM

अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कारवाई सुरू केली असून ठाकरे गटासह काँग्रेसमधील नेत्यांनी शिंदे गटातील आमदार हे आपात्र ठकरतील असे ठाम मत व्यक्त केलं आहे.

लापूर, 14 ऑगस्ट 2023 | शिंदे आणि ठाकरे गटातील आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार लटकत आहे. अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कारवाई सुरू केली असून ठाकरे गटासह काँग्रेसमधील नेत्यांनी शिंदे गटातील आमदार हे आपात्र ठकरतील असे ठाम मत व्यक्त केलं आहे. तर अजित पवार हेच राज्याचे नवे मुख्यमंत्री असतील असेही काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं. मात्र काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाई यांनी याबाबात मात्र मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी, अपात्रतेसंदर्भात शिंदे सरकारचा निकाल लागणारच नाही. १६ पैकी एकाही आमदाराचे सदस्य पद रद्द होणार नाही. हे सरकार असंच पुढे ढकलत चालु राहील. निकालाचा काहीही राजकीय परिणाम या सरकारवर होणार नाही असं म्हटलं आहे. तर अजित पवार कदापी मुख्यमंत्री होणार नाहीत. आणि कुणी त्यांना मुख्यमंत्री देखील करणार नाही असा दावा दलवाई यांनी केलाय.

Published on: Aug 14, 2023 03:03 PM