जळगावमध्ये महाविकास आघाडीत कॉंग्रेसचा खोडा, हे माजी खासदार म्हणाले…
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादीचे नेते, आमदार एकनाथ खडसे यांचे वजन आहे. मात्र, त्यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे भाजपला जिल्ह्यात खिंडार पडले आहे. तर, शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाची ताकद कमी झाली आहे.
जळगाव | 28 ऑक्टोबर 2023 : महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि कॉंग्रेस यांच्यात अद्याप जागावाटप निश्चित झालेले नाही. समसमान जागावाटप व्हावे अशी मागणी याआधीच ठाकरे गटाने केली आहे. मात्र, याच जागावाटपावरून जळगावमध्ये राजकीय कुरघोडी सुरु झालीय. रावेर लोकसभेचे काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील यांनी जिल्ह्यातील दोन्ही जागा कॉंग्रेसच लढणार असा दावा केलाय. जळगावमधील जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा आणि विधानसभेच्या सहा जागाही आम्ही मागणार आहोत, असा खळबळजनक दावा त्यांनी केलाय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. त्यानिमित्त जिल्ह्यात ठिकठिकाणी मेळावे, भव्य सभा घेण्यात येणार आहेत. लोकसभा, विधानसभा मतदारसंघात आमची ताकद आहे. त्यामुळे या जागा आम्ही मागणार आहोत असेही उल्हास पाटील म्हणाले.
Published on: Oct 28, 2023 09:11 PM
Latest Videos