Atul Bhatkhalkar On Aaditya Thackeray | अतुळ भातखळ यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप – tv9
तसेच भातखळ यांनी यावेळी, अस्लम शेख यांच्या स्टुडिओला एमसीझेड ने परमिशन कशी दिली? कोणाच्या दबावामुळे दिली? हे पाहणे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.
माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर भाजप नेते आणि आमदार अतुळ भातखळ यांनी पुन्हा एकदा आरोप केला आहे. यावेळी भातखळ यांनी अस्लम शेख यांच्या स्टुडिओवरून केला आहे. तसेच भातखळ यांनी यावेळी, अस्लम शेख यांच्या स्टुडिओला एमसीझेड ने परमिशन कशी दिली? कोणाच्या दबावामुळे दिली? हे पाहणे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. तर एमटीडीसीच्या 38 हजार चौरस फुटाच्या जागेवर दीड लाख ट्रकची भरणी कशी करण्यात आली? त्याला परवानगी कोणी दिली? तेथील झाडे कशी नष्ट करण्यात आली? याचा तपास व्हावा अशी मागणी करण्यात केली आहे. तर अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांच्या स्टुडिओ व्हिडीटचा काय योगायोग आहे असा प्रश्नही भातखळ यांनी उपस्थित केला. तसेच या प्रकरणाची चारी बाजूने चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
Published on: Aug 26, 2022 02:52 PM
Latest Videos