‘माझ्यावर बदाव होता, मात्र मी समझोता केला नाही’; राष्ट्रवादीच्या नेत्याने ईडीचं सत्य सांगितलं
शरद पवार यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार गटावर जोरदार निशाना साधला. तसेच अजित पवार आणि त्यांच्याबरोबर नेते का गेले याचं कारण देखील त्यांवनी स्पष्ट केलं. तर त्यावेळी त्यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे नाव घेत त्यांनी निष्ठा राखल्याचे म्हटलं होतं.
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी एका कार्यक्रमात बंडखोर आमदार जे अजित पवार गटात गेलेत त्यांच्यावर जोरदार निशाना साधला. त्यांनी अजित पवार गटावर टीका करताना, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्याविरुद्ध चौकशी सुरू केल्यामुळे ते भाजपच्या मांडीवर जाऊन बसले असा घणाघात केला. तर ईडीच्या चौकशीच्या भीतीनेच काही सदस्यांनी पक्ष सोडल्याचे ते म्हणाले. यासोबतच माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुरुंगात असतानाच भाजपने ऑफर दिली असा दावा देखील केला. मात्र त्यांनी निष्ठा दाखवत चौकशीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचा दावाही त्यांनी केला. त्यावर देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पवार, बोलले की आमच्यातले नेते ईडीच्या भितीनं गेले ते खरं आहे. माझ्यावरंही भाजपकडून समझोचा करण्यासाठी दबाव होता. मलाही ऑफर होती. पण मी, सरळ सांगितलं की समझौता करणार नाही, त्याच्या दुसऱ्याच दिवशी माझ्यावर धाड पडली. या स्पष्टीकरणानंतर आता भाजपकडून काय उत्तर येत हे पाहवं लागेल.