मुश्रीफांच्या याचिकेवर सुनावणी; दिलासा की अटक? ईडीचे अधिकारी ही कागलात तळ ठोकूण
तिसऱ्यांदा छापा टाकत झाडाझडती घेतल्यानंतर मुश्रीफ हे नॉट रिचेबल झाले होते. ते 2 दिवसांनंतर घरी परतले आणि आपण आपली बाजू वकिलांमार्फत ईडीकडे मांडणार असल्याचे त्यांनी म्हटलं होतं
मुंबई : माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. आप्पासाहेब नलावडे कारखान्याच्या गैरव्यवहाराप्रकरणी त्यांची ईडी कडून चौकशी करण्यात येत आहे. तर याप्रकरणी ईडीकडून दोन महिन्यात तीन वेळा त्यांच्या घरासह पुण्यात छापेमारी करण्यात आली आहे. तिसऱ्यांदा छापा टाकत झाडाझडती घेतल्यानंतर मुश्रीफ हे नॉट रिचेबल झाले होते. ते 2 दिवसांनंतर घरी परतले आणि आपण आपली बाजू वकिलांमार्फत ईडीकडे मांडणार असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. तर मुंबई उच्च न्यायालयात नव्याने रिट याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे मुश्रीफांना दिलासा मिळतो की धक्का बसतो? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेलं आहे. यादरम्यान मुश्रीफांच्या घरावर छापे टाकणारे ईडीची अधिकारी यांचेही लक्ष या सुनावणीकडे लागले असून ते कोल्हापुरातच तळ ठोकून आहेत.
Published on: Mar 14, 2023 11:50 AM
Latest Videos