मुश्रीफांना दिलासा; कारवाई न करण्याचेही निर्देश
ईडीच्या कारवाईनंतर मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्याने रिट याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली.
मुंबई : माजी कामगार मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत असतानाच आता दिलासा देणारी बातमी आली आहे. ईडीच्या कारवाईनंतर मुश्रीफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात नव्याने रिट याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. यावेळी कोर्टाने मुश्रीफ यांना दिलासा देत ईडीच्या प्रकरणात पुढील दोन आठवडे अटकेची कारवाई न करण्याचे निर्देश दिले आहेत. याचबरोबर मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज करण्याचे निर्देशही मुश्रीफांना हायकोर्टाने दिले आहेत. मात्र गुन्हा रद्द करण्यासाठीच्या याचिकेवरील सुनावणी तूर्तास तहकूब करण्यात आली आहे.
Published on: Mar 14, 2023 01:57 PM
Latest Videos