शिवानी वडेट्टीवार यांच्यावरून भाजपचा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आक्रमक भूमिका घेत आपल्या कन्येला संस्कार द्या, असे विजय वडेट्टीवार यांना म्हटलं आहे. तर आता यावरून भाजपही आक्रमक जालेली दिसत आहे
मुंबई : माजी मंत्री काँग्रेसचे नेते आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची कन्या, तसेच प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांनी वीर सावरकरांबाबत खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठं वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकर यांच्याविषयी बोलताना बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. हे तुम्ही आपल्या राजकीय विरोधकांविरोधात वापरलं पाहिजे, असे सावरकरांचे विचार होते, असे म्हटलं आहे. त्यावरून आता चांगलेच राजकीय वातावरण तापलेलं आहे. यावरूनच भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आक्रमक भूमिका घेत आपल्या कन्येला संस्कार द्या, असे विजय वडेट्टीवार यांना म्हटलं आहे. तर आता यावरून भाजपही आक्रमक जालेली दिसत आहे. शिवानी वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावरून भाजपने पुन्हा एकदा आपला मोर्चा उद्धव ठाकरे यांच्याकडे वळवला आहे. यावेळी भाजपने ठाकरे यांना कोंडीत पकडण्यासाठी घणाघात करत, आता उद्धव ठाकरे यावर काय बोलणार? बोलणार की की बोटचेपी भूमिका घेणार असा सवाल करत घेरण्याचा प्रयत्न केला आहे.