‘संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’; यशोमती ठाकूर संतापल्या
त्यांनी अमरावतीमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. तर त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील विरोधक आता रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध जिल्ह्यात आंदोलने आज करण्यात आली आहेत.
अमरावती, 29 जुलै 2023 | शिवप्रतिष्ठानचे मनोहर उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचं वादग्रस्त वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यांनी अमरावतीमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याने खळबळ उडवून दिली आहे. तर त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील विरोधक आता रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध जिल्ह्यात आंदोलने आज करण्यात आली आहेत. तर भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून अमरावतीत काँग्रेस आक्रमक झाली असून माजी मंत्री काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी गांधीजींचा फोटो घेऊन काँग्रेसने राजकमल चौकात आंदोलन केले. यानंतर महात्मा गांधी संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडेंना तात्काळ अटक करा, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी पोलीसांकडे केली. यावेळी दाखल झालेल्या गुन्हा वरून द्खील संताप व्यक्त केला. तसेच सरकारला इशारा देताना भिडे यांना 24 तासात अटक करा अन्यथा अमरावती आयुक्तालय कार्यालयात आंदोलन करू असा इशारा दिला आहे. तर त्यांनी भिडे यांचा उल्लेख हरामखोर संभाजी भिडे असा करत यांना अटक करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा असे म्हटलं आहे. तर आम्ही मागणी लावून धरल्यानंतर पोलिसांनी थातुरमातुर गुन्हा दाखल केल्याचा आरोप केलाय. तर अमरावतीचे भाचे देवेंद्र फडणवीस आहे ते कसा महात्मा गांधी यांचा अवमान सहन करू शकतात असा देखील सवाल उपस्थित केला आहे.