काँग्रेसने हकालपट्टी केल्यानंतर आशिष देशमुख ॲक्शन मोडवर; म्हणाले...

काँग्रेसने हकालपट्टी केल्यानंतर आशिष देशमुख ॲक्शन मोडवर; म्हणाले…

| Updated on: May 25, 2023 | 9:30 AM

पक्षाच्या शिस्तपालन समितीने देशमुख यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली. पक्ष न नेत्यांविरोधात सातत्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे देशमुख यांना आधीच काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते.

नागपूर : माजी आमदार आशिष देशमुख यांच्यावर अखेर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली आहे. पक्षाच्या शिस्तपालन समितीने देशमुख यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली. पक्ष न नेत्यांविरोधात सातत्याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे देशमुख यांना आधीच काँग्रेसमधून निलंबित करण्यात आले होते. देशमुख हे गेल्या काही दिवसांपासून उघडपणे पक्षविरोधी भूमिका घेत होते. याच्याआधी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी हल्लाचढवला होता. तर राहुल गांधी यांनी ओबीसीच्या मुद्यावर माफी मागावी असं म्हटलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर आता ही कारवाई करण्यात आली आहे. यादरम्यान देशमुख यांनी आपली पहिली प्रतिक्रिया देताना आपल्याला फक्त ओबीसीच्या मुद्यावर आवाज उठवल्यानेच कारवाई करण्यात आल्याचे म्हटलं आहे.

Published on: May 25, 2023 09:30 AM