‘असा बोळा फिरवला जातोय आता मात्र हे असह्य’; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भाजप महिला नेत्याकडून घरचा आहेर
हा पुल आज प्रवाशांसाठी खूला होणार असून केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. मात्र आता याच्याआधीच येथे भाजप नेत्यांमध्ये नाराजीनाट्य रंगले आहे.
पुणे, 12 ऑगस्ट 2023 |येथील सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या चांदणी चौक पुलाचे आज उद्घाटन होणार आहे. हा पुल आज प्रवाशांसाठी खूला होणार असून केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते याचे उद्घाटन होणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. मात्र आता याच्याआधीच येथे भाजप नेत्यांमध्ये नाराजीनाट्य रंगले आहे. या पुलाच्या उद्घाटनावरून आता भाजप महिला नेत्या भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी थेट पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरच निशाना साधत बोचरी टीका केली आहे. कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर पोस्ट टाकून पक्षाबद्दलची नाराजी व्यक्त करताना आपल्याला या उद्धातने कार्यक्रमातून वगळण्यात आल्याचा आरोप करताना, चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले असे म्हटलं आहे. तर माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीवर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे अशी टीका केली आहे. याचबरोबर त्यांनी आणखीन काय टीका केलीय पाहा…