आडाम मास्तर चुक्याच… पंतप्रधान मोदींसमोरच म्हणाले, उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे अन्…

| Updated on: Jan 19, 2024 | 3:12 PM

सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण आज मोदींच्या हस्ते करण्यात येत आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात बोलत असताना माकप नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम अर्थात आडम मास्तर यांचा मोठा गोंधळ उडाला

सोलापूर, १९ जानेवारी २०२४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रातील सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापूरच्या नगर कुंभारी येथील पंतप्रधान आवास योजनेंतर्गत असंघटित कामगारांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचे लोकार्पण आज मोदींच्या हस्ते करण्यात येत आहे. दरम्यान, याच कार्यक्रमात बोलत असताना माकप नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम अर्थात आडम मास्तर यांचा मोठा गोंधळ उडाला. मान्यवरांचे स्वागत करताना आडम मास्तर यांनी उद्धव ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री असा उल्लेख केला. यावेली आडम मास्तर चुकून उपमुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे असं म्हणाले. मात्र झालेली ही मोठी चूक लक्षात येता त्यांनी त्वरीत जाहीर माफी ही मागितली. आडम मास्तरांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं नाव घेण्याऐवजी त्यांनी चुकून उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख उपमुख्यमंत्री म्हणून केला. दरम्यान, या चुकीवर खुलासा करताना ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे नेहमी सोबत येत असल्याने माझ्या तोंडात त्यांचे नावं बसले आहेत, माफी असावी असे म्हणत त्यांनी पुढे भाषण केले.

Published on: Jan 19, 2024 03:04 PM
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांच्या दिमतीला व्हॅनिटी व्हॅन, व्हॅनिटीतूनच मुंबईला येणार; काय आहेत सुविधा?
Ayodhya Ram Mandir : नशीबच भारी… महाराष्ट्रातील ‘या’ दाम्पत्याला रामलल्लाच्या पूजेचा मान, मोदींसोबत बसणार पूजेला