अहमदनगर विभाजनावर माजी आमदार झाला आक्रमक?कोणती मागणी?
अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाची देखील मागणी सातत्याने केली जात आहे. जवळपास तीस वर्षांपासून प्रशासकीय सोयीसाठी अहमदनगर जिल्हा विभाजन व्हावा अशी मागणी केली जात आहे.
अहमदनगर : राज्यात गेल्या अनेक दशकांपासून प्रशासकीय सोयीसाठी आकारमानाने मोठ्या असलेल्या जिल्ह्यांची विभाजन करण्याची मागणी जोर धरत आहे. यात अहमदनगर जिल्ह्याच्या विभाजनाची देखील मागणी सातत्याने केली जात आहे. जवळपास तीस वर्षांपासून प्रशासकीय सोयीसाठी अहमदनगर जिल्हा विभाजन व्हावा अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, आमदार राम शिंदे यांच्या प्रयत्नातून शिंदे फडणवीस सरकारने अहमदनगरचे पुण्यश्लोक अहिल्यानगर असे नामकरण केले आहे. यानंतर आता अहमदनगर जिल्ह्याचं विभाजन झालंच पाहिजे असा पवित्रा माजी आमदार राहुल जगताप यांनी घेतला आहे. तसेच जिल्ह्यातील दक्षिण आणि उत्तरेतील तुलना केली तर दोन्हीकडच्या विकासात जमीन आसमानाचा फरक असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. तर मंत्री पद उत्तरेत मिळतात तर दक्षिणेकडे प्रशासनाचाही समतोल नाही अशी टीका त्यांनी केली आहे. जिल्हा विभाजनाचा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असून भविष्याच्या विकासाच्या दृष्टीने जिल्हा विभाजन फार गरजेचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. तर नामांतराला आमचा विरोध नाही. मात्र नामांतर करत असतानाही जिल्ह्याचा विभाजन करा आमच्या विकासाचा अनुशेष भरून निघेल असही ते म्हणालेत.