Devendra Fadnavis : मोहोळचे माजी आमदार राजन पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, पाटील म्हणतात, मी राष्ट्रवादीतच...

Devendra Fadnavis : मोहोळचे माजी आमदार राजन पाटील देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, पाटील म्हणतात, मी राष्ट्रवादीतच…

| Updated on: Jul 25, 2022 | 7:56 PM

शेवटी कोणतेही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हे राज्याचे असतात. त्यामुळं लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अशा भेटी घ्याव्या लागतात, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

मुंबई : माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांनीही फडणवीस यांची भेट घेतली. मी राष्ट्रवादीतच असल्याचं राजन पाटील यांनी स्पष्ट केलंय. लोकप्रतिनिधी अशा भेटी घेत असतात, असं उत्तर अजित पवार यांनी दिलंय. मी राष्ट्रवादीतच असल्याचं राजन पाटील म्हणाले. कामानिमित्त आम्ही भेटायला आलो असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना सांगितलं होतं. लोकप्रतिनिधींना काही कामं असले तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटावं लागते. आमदार, खासदार हे भेटी देत असतात. शेवटी कोणतेही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हे राज्याचे असतात. त्यामुळं लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अशा भेटी घ्याव्या लागतात, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

Published on: Jul 25, 2022 07:44 PM