‘शेतकऱ्यांची नुकसान भरपाई आठ दिवसात द्या, अन्यथा थेट मुख्यमंत्र्याच्या कार्यक्रमात घुसू’; राजू शेट्टी यांचा इशारा
त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी सरकारकडे केली आहे. तर काही ठिकाणी पंचनामे सुरू आहेत तर अद्यापही काही ठिकाणी पंचनामे सुरू झालेले नाहीत. त्यामुळे आता शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे.
जळगाव, 30 जुलै 2023 | गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. ज्यामुळे लाखो हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. तर घरांची पडझड होण्यासह जणावरांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी सरकारकडे केली आहे. तर काही ठिकाणी पंचनामे सुरू आहेत तर अद्यापही काही ठिकाणी पंचनामे सुरू झालेले नाहीत. त्यामुळे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे. त्यांनी, शेतकर्यांच्या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधार्यांसह विरोधकांचेही दुर्लक्ष झाल्याचे नमूद करत ”आठ दिवसांच्या आत नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत न मिळाल्यास आपण शासन आपल्या दारी कार्यक्रमात थेट घुसू असा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मदतीवरून मुख्यमंत्र्यांनाच जाब विचारू असाही इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय.