वेदोक्त मंत्र प्रकरणावरून आव्हाड संतापले; मग सामान्यांचं काय?
काळाराम मंदिरात या आधी शाहू महाराज हे गेले होते त्यावेळी त्यांना देखील विरोध झाला तर आता देखील त्यांच्या सूनबाई यांना हा विरोध करण्यात आला
ठाणे : माजी खासदार संभाजी छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजे छत्रपती यांना वेदोक्त मंत्र म्हणण्यापासून रोखण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार ऐतिहासिक काळाराम मंदिरातच प्रकार घडला. त्यानंतर याप्रकरणावरून आता राजकारण चांगलंच तापलेलं दिसत आहे. याचप्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारवर घणाघात केला. तसेच आज जे मोर्चे काढतायेत त्यांचे थोबाडं का बंद आहेत असा सवाल केला आहे. यानंतर आता राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखिल आता प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी राणी संयोगिता यांच्याशी जर हे महंत असं वागू शकतात तर सामान्य नागरिकांना काय वागणूक दिली जात असेल हे आपण ओळखले पाहिजे असं म्हटलं आहे.
Published on: Apr 01, 2023 09:02 AM
Latest Videos