‘औरंगजेबवर जे कुणी बोलत असतील ते साफ चुकीचं’; प्रकाश आंबेडकर यांच्यावर कोणी केली टीका?

‘औरंगजेबवर जे कुणी बोलत असतील ते साफ चुकीचं’; प्रकाश आंबेडकर यांच्यावर कोणी केली टीका?

| Updated on: Aug 07, 2023 | 8:50 AM

ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या एका वक्तव्यामुळे सुरू झालेल्या वादामुळे आता वार पलटवार सुरू झाले आहेत. तर औरंगजेब हा देशाचा हिरो होऊ शकतो, पण तो फडणवीस यांचा हिरो होऊ शकत नाही, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केल होतं.

सोलापूर, 7 ऑगस्ट 2023 | राज्यात सध्या औरंगजेबवरून पुन्हा नवा वाद सुरू झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या एका वक्तव्यामुळे सुरू झालेल्या वादामुळे आता वार पलटवार सुरू झाले आहेत. तर औरंगजेब हा देशाचा हिरो होऊ शकतो, पण तो फडणवीस यांचा हिरो होऊ शकत नाही, असं वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केल होतं. त्यावरून स्वराज्य पक्षाचे नेते आणि माजी खासदार संभाजीराजे यांनी टीका केली आहे. संभाजीराजे यांनी यावेळी सोलापुरात आंबेडकर यांचे नाव न घेता टीका केली. त्यांनी औरंगजेब हा देशात कोणत्याही समाजाचा किंवा व्यक्तीचा आदर्श होऊ शकत नाही. जे कोणी असं बोलत असतील ते साफ चुकीचे असल्याचे म्हणत आंबेडकर यांच्यावर निशाना साधला आहे.

Published on: Aug 07, 2023 08:50 AM