Dr. Manmohan Singh : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, संपूर्ण देशात 7 दिवसांचा दुखवटा
भारताचे माजी पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांचं वयाच्या 92 व्या वर्षी गुरूवारी रात्री निधन झालं. त्यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आ
भारताचे माजी पंतप्रधान, डॉ. मनमोहन सिंह यांचं वयाच्या 92 व्या वर्षी गुरूवारी रात्री निधन झालं असून संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वळणाचे जनक म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांना ओळखले जाते. कामाप्रती असलेला शैक्षणिक दृष्टिकोन, जनसामान्यांसाठी असलेली उपलब्धता आणि विनम्र आचरणामुळे ते कायमच चर्चेत असायचे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर देशात 7 दिवसांचा शासकीय दुःखवटा जाहीर करण्यात आला आहे. या काळात देशातील सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. आज सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार असून त्यामध्ये डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली जाणार आहे.
डॉ. मनमोहन सिंग हे मितभाषी म्हणून ओळखले जायचे. मात्र काही प्रसंगी त्यांनी केलेली विधानं अथवा उत्तर कायम चर्चेत राहिली. दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांना संसदेत त्यांनी शेरोशायरीतून दिलेलं उत्तर आजही अनेकांच्या स्मरणात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच देशातील अनेक राजकारणी, नेत्यांनी, दिग्गजांनी डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.