Rajesh Kishrsagar at Guwahati| शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर गुवाहाटीत एकनाथ शिंदेंच्या गोटात

Rajesh Kishrsagar at Guwahati| शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर गुवाहाटीत एकनाथ शिंदेंच्या गोटात

| Updated on: Jun 24, 2022 | 8:18 PM

. राजेश क्षीरसागर हे कोल्हापुरातील नेते असून कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतही ते दोन दिवस नॉटरिचेबल होते. काही दिवसांपूर्वीच पुन्हा ते नॉटरिचेबल झाले, ते आज थेट गुवाहाटीतच दिसले.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. शिवसेनेचे चाळीस ते बेचाळीस आमदार आमच्याकडे असल्याचा दावा हा एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे. आणि ही संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. येत्या काही वेळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. आता शिवसेनेचे बंडखोर नेते माजी आमदार राजेश क्षीरसागर हेही गुवाहाटीत दाखल झाले आहेत. राजेश क्षीरसागर हे कोल्हापुरातील नेते असून कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीतही ते दोन दिवस नॉटरिचेबल होते. काही दिवसांपूर्वीच पुन्हा ते नॉटरिचेबल झाले, ते आज थेट गुवाहाटीतच दिसले. गेल्या दोन दिवसांत शिवसेनेच्या मुंबईतल्या बैठकांना उपस्थित असणारे नेतेही काही काळातच गुवाहाटीत दिसून आले आहेत. त्यामुळे ही गळती रोखण्याचं आव्हान ठाकरेंसमोर असणार आहे.

Published on: Jun 24, 2022 08:18 PM