Nashik : गोदावरीच्या पुरात चारजण अडकले, अचानक आललेल्या पुरामुळे घडली दुर्घटना
झोपलेल्या अवस्थेत असतानाच पुराच्या पाण्याचा वेढा बसला आणि यामध्येच ही घटना घडली आहे. यंदा मान्सूनची कृपादृष्टी ही उत्तर भारतावर जरा अधिकचीच पाहवयास मिळालेली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. तर सर्वाधिक पिकांचे नुकसानही याच जिल्ह्यात झाले आहे. चारजण झोपेतच असताना घडलेल्या या घटनेची शहरभर चर्चा सुरु आहे.
नाशिक : यंदा (Heavy Rain) पावसाने असा काय धुमाकूळ घातला आहे की, कधी काय होईल हे सांगता येत नाही. आता (Nashik) नाशिकमधील रामकुंड परिसरात चौघेजण हे झोपले होते. अचानक रात्री पाणी वाढले आणि (Godavari River) गोदावरीला पूर आला. यामध्ये रामकुंड परिसरात झोपलेले हे चोघे पुराच्या पाण्यात अडकले होते. अखेर जीव रक्षक दलाच्या जवानाने यामधील एकाला वाचवले तर अन्य तिघांसाठी शर्थीचे प्रयत्न सुरु होते. झोपलेल्या अवस्थेत असतानाच पुराच्या पाण्याचा वेढा बसला आणि यामध्येच ही घटना घडली आहे. यंदा मान्सूनची कृपादृष्टी ही उत्तर भारतावर जरा अधिकचीच पाहवयास मिळालेली आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाला आहे. तर सर्वाधिक पिकांचे नुकसानही याच जिल्ह्यात झाले आहे. चारजण झोपेतच असताना घडलेल्या या घटनेची शहरभर चर्चा सुरु आहे.
Published on: Sep 01, 2022 04:43 PM
Latest Videos