फॉक्सकॉनचा वेदांतसोबतचा करार तुटला; प्रकल्पावर परिणाम होणार? फॉक्सकॉन कंपनीने केलं स्पष्ट
तैवानची कंपनी असणाऱ्या फॉक्सकॉनने सोमवारी वेदांतसोबतच्या करारातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. ज्यामुळे भारतातील सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्याची शक्यता धुसर झाली होती.
मुंबई : देशाच्या उद्योग जगतात आणि महाराष्ट्राच्या विकासात मोठा हातभार लावणारा वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने मोठी टीका झाली होती. त्यानंतर काल देशालाच धक्का देणारी बातमी समोर आली. ज्यात तैवानची कंपनी असणाऱ्या फॉक्सकॉनने सोमवारी वेदांतसोबतच्या करारातून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. ज्यामुळे भारतातील सेमीकंडक्टर प्रकल्प उभारण्याची शक्यता धुसर झाली होती. मात्र आता यावरून कंपनीने आपली भूमिका स्पष्ट करताना मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे उद्योग जगताला आशेचा किरण दिसत आहे. भारतात सेमीकंडक्टर उत्पादन युनिट स्थापन स्वतंत्रपणे अर्ज केला जाईल. त्यासाठी 50 टक्के भांडवली सहाय्य शोधला जात अशल्याचे म्हटलं आहे. त्यामुळे भारतात आता वेदांतशिवाय आता सेमीकंडक्टर उत्पादन युनिट फॉक्सकॉनने भारतात लावण्याच्या हालचाली सुरू केल्याचे समोर येत आहे.
Published on: Jul 12, 2023 11:31 AM
Latest Videos