Satej Patil | मंत्री सतेज पाटलांचा पीए असल्याचं सांगून 10 लाखांची फसवणूक

Satej Patil | मंत्री सतेज पाटलांचा पीए असल्याचं सांगून 10 लाखांची फसवणूक

| Updated on: Jun 18, 2022 | 1:53 PM

चक्क मंत्री सतेज पाटलांना पीए आहे सांगत ही फसवणुक केली आहे. पाच कोटीचे लोन देण्याच्या बहाण्याने याने 10 लाखांची फसवणूक केली आहे.

नवी मुंबईतल्या कामोठ्यात एक फसवणुकीचा प्रकार घडलेला आहे. साधासुधा फसवणुकीचा प्रकार नाही तर या गंडव्याने चक्क मंत्री सतेज पाटलांना पीए आहे सांगत ही फसवणुक केली आहे. पाच कोटीचे लोन देण्याच्या बहाण्याने याने 10 लाखांची फसवणूक केली आहे. ही फसवणुक करताना याव्यक्तीने मंत्री सतेज पाटलांच्या नावाचा गैरवापर केला आहे. बंटी पाटलांना पीए असल्याचे त्याने फोनवरून सांगितले.एखाद्या नेत्याच्या नावाने फसवणूक होण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. मागेही पुण्यात असेच एक प्रकरण समोर आलं होतं ज्यात अजित पवार यांच्या नावाचा वापर केला होता.