गणेश मंडळांना मोफत पार्किंगची सोय उपलब्ध होणार, मुख्यमंत्र्यांचे आदेश
गणेशोत्सव तोंडावर आला आहे. या गणेशोत्सवात मुंबईत रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील गणेश मंडळांना वाहन पार्किंगसाठी जागा उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. आपल्या लाडक्या बाप्पााच्या आगमनासाठी सर्व जण आतूर झाले आहे. आता गणेश मंडपाजवळ वाहन पार्किंगची व्यवस्था उभारण्यात यावेत असे आदेश मुख्यमंत्र्यानी दिलेले आहेत. गणेशमंडळाना मेडीकलची सुविधा देखील पुरण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुंबई शहरात १२ हजाराहून अधिक मंडळे स्थापन झालेली आहेत. मोठ्या मंडळाना डॉक्टर, परिचारिका आणि एम्ब्युलन्स पुरविण्याचे आदेश देखील महापालिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत.
Published on: Aug 23, 2024 05:43 PM
Latest Videos