Chandrashekhar Bawankule : आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार; बावनकुळेंनी दिली माहिती
Chandrashekhar Bawankule News : आता घरकुलांना पाच ब्रास मोफत वाळू मिळणार असल्याची माहिती मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली आहे. वाळू धोरणाबद्दल बोलताना त्यांनी या निर्णयाबद्दल सांगितलं.
या आठवड्यात वाळू धोरण हे मंत्रिमंडळासमोर जाईल. त्यानंतर ज्या ठिकाणी लिलाव झाले नाही आणि जेथे EC ची परवानगी मिळाली आहे, त्याठिकाणी लिलाव घेतले जातील. तसंच घरकुलांना पाच ब्रास वाळू मोफत देण्याचाही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली आहे. याबद्दलचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं की, एकंदरीतच जेवढी मागणी तेवढा पुरवठा असं वाळू धोरण तयार करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात आम्ही वाळू तयार करणाऱ्या मशीनला देखील प्रोत्साहन देणार आहे. त्यामुळे वाळूच्या मागणीत आणि पुरवठ्यात असलेली तफावत दूर होण्यात मदत होईल, असंही बावनकुळे यांनी सांगितलं आहे.