Immersion of Ganesh: गणपती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर मुंबई महापालिकेकडून पूर्ण तयारी
गणेश विसर्जनासाठी संपूर्ण तयारी मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी कुठल्याही अनुचित प्रकार घडून नाही, याची खबरदारी सुद्धा मुंबई पोलिसांकडून घेण्यात येत आहे. मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला होता.
मुंबई- मुंबईमध्ये गणेश विसर्जनासाठी मोठा पोलीस (Police )बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. चौपाटी परिसरामध्ये रॅपिडक्शन फोर्स तैनात करण्यात आलेली आहे. मुंबईतील गणेश विसर्जनासाठी(Immersion of Ganesh) साधारणतः 15 हजारहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे.यामध्ये विसर्जनाच्या ठिकाणी होमगार्ड , सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आलेले आहेत. गणेश विसर्जनासाठी संपूर्ण तयारी मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी कुठल्याही अनुचित प्रकार घडून नाही, याची खबरदारी सुद्धा मुंबई पोलिसांकडून घेण्यात येत आहे. मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी लावण्यात आलेला होता. मुंबई(Mumbai) पोलीस आयुक्त यांनी काल संपूर्ण झोनमधील पोलीस उपायुक्त यांची बैठक घेतली आहे. त्या बैठकीनंतर संपूर्ण बंदोबस्ताच्या संदर्भात अचूक सूचना सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेले आहेत