गडचिरोलीच्या ‘लेडी टॅक्सी चालक’ युवतीला इंग्लंडच्या विद्यापीठात प्रवेश, जिद्दीला सॅल्यूट पण…

| Updated on: Feb 10, 2023 | 2:16 PM

गडचिरोलीच्या लेडी टॅक्सी चालक युवतीला इंग्लंडच्या विद्यापीठात प्रवेश पण 'ही' आहे अडचण?

गडचिरोली : गडचिरोली सारखा आदिवासी आणि नक्षली विभागात राहणाऱ्या आणि घरी बेताची परिस्थिती असणाऱ्या किरण रमेश कुर्मा हिने टॅक्सीचं स्टेअरिंग हातात घेतले आणि टॅक्सी चालवून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाला सुरुवात केली. गडचिरोलीतील लेडी टॅक्सी चालक म्हणून ती फेमसही झाली. पण हे करताना शिक्षण मात्र सोडलं नाही. ती शिकत राहिली परीक्षा दिली. परीक्षा दिल्यानंतर तिला शिक्षणासाठी सातासमुद्रापलिकडे जाण्याची संधी आली. गडचिरोलीची लेडी टॅक्सीचालक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किरण रमेश कुर्मा हिची आणि तिच्या जिद्दीची. किरणला उच्च शिक्षणासाठी इंग्लंडच्या प्रसिद्ध ‘लीड्स’ विद्यापीठात प्रवेश मिळाला असून तिचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. मात्र किरणला लीड्स विद्यापीठात प्रवेश मिळाला असला तरी तिच्या समोरील अडचणीचा डोंगर अजून संपलेलान नाही. या विद्यापीठात 27 लाख रुपये शुल्क भरायचे आहे. एवढी रक्कम भरायची कुठून? असा प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला आहे.

Published on: Feb 10, 2023 02:16 PM
राज ठाकरे यांची गुरू माँ कांचन गिरी यांनी घेतली भेट, काय झाली चर्चा?
आदित्य ठाकरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत शहाजी बापू पाटील म्हणतात…