2024 ला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार; 'या' वरिष्ठ नेत्याला विश्वास

2024 ला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार; ‘या’ वरिष्ठ नेत्याला विश्वास

| Updated on: Jan 30, 2023 | 7:29 AM

शिंदेगटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी येत्या 2024 च्या निवडणुकीबाबत महत्वाचं विधान केलंय. काय म्हणालेत पाहा...

मुंबई : “2024 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान होणार. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आणि मुंबई महापालिकेवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार”, असा विश्वास शिंदेगटाचे खासदार गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केलाय. शिवसेनेच्या ठाकरेगटाचे माजी नगरसेवक आत्माराम चाचे, माजी नगरसेवक सदाशिव पाटील आणि माजी नगरसेवक धनश्री भराडकर यांनी शिंदेगटात प्रवेश केला. गजानन किर्तीकर यांच्याकडून आयोजित योगालय-बाल संस्कार केंद्र लोकार्पण सोहळा कार्यक्रमात शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी गजानन किर्तीकर बोलत होते.

Published on: Jan 30, 2023 07:29 AM