घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्य दाखविण्यासाठी 21 भाज्यांची खरेदी
बाप्पाच्या आगमनासाठी बाजारपेठा सजल्या आहेत.त्यामुळे बाप्पाला नैवेद्य दाखविण्यासाठी मोदक, मिठाई पासून ते फुले आणि भाज्यांपर्यंत प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे.
गणपती बाप्पाला आपआपल्या घरी नेण्याची तयारी आज गणेश चतुर्थीनिमित्त दिसत आहे. नाशिकच्या बाजारपेठामध्ये आज बाप्पाला दाखवायच्या नैवेद्याची तयारी करण्यासाठी 21 भाजाची खरेदी सुरु झालेली आहे. या भाज्या मोसमात येत असतात. अनेक बाजारपेठा आज बाप्पाच्या आगमनाच्या तयारीने गजबजलेल्या दिसल्या आहेत. यंदा बाप्पाच्या मूर्तीपासून ते सजावटीच्या साहित्यात 25 ते 30 टक्के दरवाढ झालेली आहे. तरीही बाप्पाच्या आगमनासाठी लोकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळत आहे. पुढील दहा दिवस आता महाराष्ट्रासह इतर आरत्यांचा आवाज दुमदुमणार आहे.
Published on: Sep 07, 2024 01:04 PM
Latest Videos