Ganesh festival 2022 : आझाद हिंद गणेश मंडळाचे यंदाचे 95वे वर्ष, गणेशोत्सवाचा उत्साह
अमरावती शहरातील बुधवारा परिसरातील आझाद हिंद गणेश मंडळाचे यंदाचे 95वे वर्ष असून यावर्षी आझाद हिंद मंडळाच्या वतीनं यंदा 12 ज्योतिर्लिंग देखाव्यासोबत भगवान शंकरची मूर्ती विशेष आकर्षण राहणार आहे.
अमरावती : कोरोनाच्या (Corona) दोन वर्षांनंतर यंदा प्रथमच राज्यात गणरायाचे (Ganesh festival 2022) आगमन धूमधडाक्यात होणार आहे. येत्या दोन दिवसांवर गणेशोत्सव आला आहे. त्यामुळे गणेश मंडळाची तयारी ही अंतिम टप्यात आली आहे. यंदा अमरावती (Amaravati) शहरात गणेशोत्सव मंडळ हे विविध देखावे सादर करणार आहे. अमरावती शहरातील बुधवारा परिसरात असलेल्या आझाद हिंद गणेश मंडळाचे यंदाचे 95वे वर्ष असून यावर्षी आझाद हिंद मंडळाच्या वतीनं यंदा 12 ज्योतिर्लिंग देखाव्यासोबत ईशा योग केंद्र, कोईम्बतूर, तामिळनाडू येथील भगवान शंकरची मूर्ती विशेष आकर्षण राहणार आहे. या मंडळाने या पूर्वी अनेक भव्य दिव्य देखावे सादर केले आहे. त्यामध्ये स्व. सोमेश्का पुसदकर यांच्या कल्पनेतून आजपर्यंत लाल किल्ला ताजमहाल, अक्षरधाम मंदिर, कोणार्क सूर्य मंदिर कन्याकुमारी, विदर्भातील प्रसिद्ध लासूर मंदिर पदमनाभमंदिर, विरुपती बालाजी मंदिर, पढरपूर विठ्ठल मंदिर पंढरपूर चारी देखावा या सोबतच अनेक सामाजिक तसेच अध्यात्मिक विषयावर देखावे साकारले आहे.
Published on: Aug 29, 2022 10:32 PM
Latest Videos